सांगलीचा ‘चोर गणपती’

सांगलीत चोर गणपतीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

Updated: Aug 30, 2014, 11:40 PM IST
सांगलीचा ‘चोर गणपती’ title=

सांगली : सांगलीत चोर गणपतीची दीडशे वर्षांची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.

श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. मात्र, सांगलीत गणपती बाप्पा मात्र दोन दिवस आगोदरच येतात.

कुणालाही न सांगता चोरुन इथं गणेशाची स्थापना केली जाते म्हणून या गणपतीला चोर गणपती असंच नाव पडलंय. गेल्या दिडशे वर्षांपासून ही प्रथा अखंड सुरू आहे ती आजपोवेतो…

हा गणपती दीड दिवसांचा असतो. कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या या गणेशमूर्तीचं विसर्जन न करता ती सुरक्षीत ठिकाणी जतन करून ठेवली जाते. या गणपतीसोबतच गणेश चतुर्थीला नियमीत गणेशाची स्थापनाही केली जाते, असं सांगली संस्थानचे राजे विजयसिंह पटवर्धन म्हणतात.

 गणेशोत्सवानिमित्त या ठिकाणी पाच दिवसांचा गणेश आराधना सोहळा आयोजित केला जातो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या या अनोख्या  सोहळ्यासाठी शेकडो भाविक येतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.