कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकऱणातील प्रमुख संशयीत आरोपी समीर गायकवाड याला सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे न्यायालयाने स्पष्ट बजावले असाताना त्याच्या हातात अंक कसा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
आज पोलीस बंदोबस्तात असणाऱ्या समीर गायकवाड हातात सनातन प्रभातचा अंक दिसून आला. न्यायालयाने सनातन प्रभातमध्ये केलेल्या अक्षेपार्ह मजकुराबद्दल सनातन प्रभातला यापूर्वी नोटीस बजावली होती. त्याचबरोबर कोर्टाने समीरला कोर्टाच्या परवानगीशिवाय सनातन प्रभातचा अंक देवू नये, असे स्पष्ट आदेश दिले होते.
न्यायालयाचे आदेश असताना देखील आज समीरला कोर्टात आणल्यानंतर त्याला सनातन प्रभातचा अंक देण्यात आला. त्यानंतर समीरने कोर्टातून बाहेर जात पोलीस व्हॅनमध्ये सनातनचा अंक घेवूनच बसला. पण पोलिसांना हा अंक कसा दिसला नाही या बद्दल प्रश्न विचारण्यात येत आहे.