सातारा : कण्हेर धरण परिसरात ग्रामस्थांना मगर आढळली. यानंतर वनविभागाच्या वनक्षेत्रपालांनी मगरीला पकडून पुण्याला रवाना केले.
ही मगर पाहण्यास कण्हेर धरण रस्त्यावर मोठ्या संख्येने ग्रामस्थांची गर्दी झाली होती. यावेळी वेण्णा नगरचा एक युवक जखमी झाला आहे.
दरम्यान शनिवारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ढाणकल गावात एक अजगर सापडले, हे अजगर ५ दिवसांपासून जखमी अवस्थेत होतं.
साडेदहा फूट लांबीच्या या अजगरावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला वन्यजीव विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.