अहमदनगर बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसरा आरोपी जेरबंद

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलंय. नितीन भैलुमे असं या आरोपीचं नाव आहे. 

Updated: Jul 17, 2016, 03:29 PM IST
अहमदनगर बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसरा आरोपी जेरबंद title=

अहमदनगर : अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात आलंय. नितीन भैलुमे असं या आरोपीचं नाव आहे. 

यापूर्वी संतोष भवार आणि जितेंद्र जोशी या आरोपींना अटक कऱण्यात आली होती.  दरम्यान याप्रकरणात आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा इशारा अहमदनगर वकील संघटनेनं दिलाय. काल याप्रकरणी संतप्त नागरिकांनी कर्जत, श्रीगोंदा आणि जामखेडमध्ये नागरिकांनी बंद पाळला होता. 

तसंच पालकमंत्री राम शिंदेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनीही मोर्चा स्थळी भेट देऊन सभागृहात आवाज उठवणार असल्याचं सांगितलंय.