मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. दिवाळीसाठी ही खास गाडी असणार आहे. ही गाडी रविवारपासून धावेल. या गाडीचे आरक्षण आजपासून सुरु करण्यात आले आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच गर्दीचा सामना करावा लागतो. अनेकवेळा वेटींगवरच राहावे लागते. तसेच प्रचंड गर्दी असल्याने कोंबून प्रवास करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन दसरा आणि दिवाळी सणाचे औचित्य साधून दादर - सावंतवाडी ही विशेष रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे.
दादर ते सावंतवाडी मार्गावर दि. ११ ते ३० ऑक्टोबरपर्यंत रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी अशा तीन दिवस ही गाडी धावणार आहे. दादरहून सकाळी ७.५० वाजता ही गाडी सुटेल ती त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता सावंतवाडीत पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ही गाडी सावंतवाडी स्थानकातून दि. १२ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान धावणार आहे. सोमवार, बुधवार आणि शनिवार या तीन दिवशी गाडी धावेल. ही गाडी पहाटे ४.५० वाजता सुटेल ती सायंकाळी ३.५० वाजता दादरला पोहोचेल.
या गाडीला एक एसी, सात सेकंड, दोन जनरल डब्बे असणार आहेत. या गाडीला थांबे ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्ग आणि झाराप असणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.