नागपूर : विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अजनी पोलिसांनी अटक केली आहे, इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरूणीला डॉ. अजित सुरेश घरडे असे या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून अजितला अटक केली.
अजितसोबत जुलै २०१३मध्ये या तरूणीची ओळख झाली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे छायाचित्रही काढले.
ही छायाचित्रे सार्वजनिक करण्याची धमकी देऊन अजित याने पीडित तरुणी आणि तिच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपयेही उकळले. त्यानंतर अजितने लग्नास नकार देताच पीडित तरुणीने अजनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.