www.24taas.com, मुंबई
राज्यात एकीकडे दुष्काळाची धग वाढत असताना उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आहे.
जिल्ह्यातल्या यावल, रावेर तालुक्यात गारपीटीचा फटका बसला. या तालुक्यात लिंबाएवढ्या गारा पडल्या. अर्धातास झालेल्या या गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालंय. केळी तसंच रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसंच मका पिकाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. सावदा, फैजपूर, न्हावी, हंबर्डी, चिनावल, विवरा, उटखेडा या गावांमध्ये सर्वाधिक केळीच्या बागांचं नुकसान झालंय.
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय.बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संध्याकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गहू तसेच फळबागांचे मोठे नुकसान झालंय.