पुणे : भारताचे सुप्रसिद्ध कार्टुनिस्ट आरके लक्ष्मण यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर पुण्यातील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना शनिवारी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये शनिवारी दाखल करण्यात आलं.
हृदयविकाराचे पेशंट असलेल्या आरके लक्ष्मण यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले आहे, त्यांना सध्या वेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
आरके लक्ष्मण ९४ वर्षांचे आहेत, त्यांचं कार्टुन कॉमन मॅन संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे, या व्यंगचित्राने सामान्य माणसाच्या रोजच्या जगणातल्या आशा आकांक्षामधून लोकांसमोर मांडलं आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन राजकारणावरही फटकारे लावले आहेत.
आरके लक्ष्मण आपलं कार्टून कॉमन मॅनसाठी प्रसिद्ध आहेत. हे कार्टून १९५१ पासून टाईम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पेजवर छापून येत होतं, यावर यू सेड इट असं शीर्षक दिलं जात होतं.
आरके लक्ष्मण यांना २००५ मध्ये पद्म विभूषण देऊन गौरवलं, टपाल विभागाने कॉमन मॅनवर १९८८ मध्ये एक टपाल तिकिटही प्रसिद्ध केलं. पुण्यात २००१ मध्ये कॉमन मॅनचा आठ फुटी पुतळाही लावण्यात आला. आरके लक्ष्मण यांची प्रकृती २०१० मध्ये अधिकच खालावली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.