नागपुरात दिवसा कपडा व्यावसायिकाची हत्या

नागपूरच्या गजबजलेल्या धरमपेठ भागात दिवसाढवळ्या कपडा व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावरून येणा-या-जाणा-या नागपूरांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.

Updated: Jan 13, 2015, 06:28 PM IST
नागपुरात दिवसा कपडा व्यावसायिकाची हत्या title=

नागपूर : नागपूरच्या गजबजलेल्या धरमपेठ भागात दिवसाढवळ्या कपडा व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर रस्त्यावरून येणा-या-जाणा-या नागपूरांच्या डोळ्यासमोर ही घटना घडली.

बाईकवरून आलेल्या ४-५ युवकांनी रितेश बैसवारे या २९ वर्षांच्या युवकावर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. ही घटना घडत असताना नागपूरकरांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. रितेश यांच्यावर जीवघेणा हल्ला होत असताना कोणत्याही नागरिकानं हल्लेखोरांना हटकण्यासाठी पुढाकार घेतला नाही.

नागरिकांच्या निष्क्रीयतेमुळंच गुन्हेगार दिवसा-ढवळ्या खूनासारखे गुन्हे करून राजरोसपणे फिरतात हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.