जालना : मूठभर लोकांसाठी अच्छे दिन आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युती तर काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी तुटली. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निवडणूक रिंगणात असतील. उमेदवारांचे पिक आलेय. तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. तुम्ही चांगले पिक (उमेदवार) आहे ते ठेवायचे आणि बाकीचे (पसंत नसतील ते उमेदवार) तन उपटून टाका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना दिला. जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
राज्यात काही ठिकाणी चौरंगी आणि काही ठिकाणी पंचरंगी लढत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जे उपयोगी असतील तेच नेते निवडणून द्या. राष्ट्रवादीने आतापर्यंत जनतेचा आणि शेतकऱ्यांचा विचार केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ द्या, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.
मला राजकारणात येऊन ५० वर्षे झालीत. त्यातील ४७ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत आलोय. कधी सत्ताधारी पक्षात तर कधी विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केले आहे. मी सतत लोकांचा विचार करीत आलो आहे. मी ४७ वर्षे एकही सुट्टीही घेतलेली नाही. कामच करत आहे. माझ्या परीने मी लोकांचे प्रश्न सोडवित आलो आहे, असे पवार म्हणालेत.
मी केंद्रीय कृषी मंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हित कसे जपले, जाईल याचा विचार केला. देशात तांदूळ, गहू आयात करावा लागत होता. आता ही परिस्थिती बदललेली आहे. आपण अन्नधान्यात स्वावलंबी झालो आहे. आपण तांदूळ १८ देशांत निर्यात करता. तसेच गहूही १५ ते १८ देशांत निर्यात करीत आहे, ही प्रगती आमच्याच काळात झाली, असे पवार म्हणालते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.