नागपूर : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
चंद्रपूरहून नागपूरकडे जात असताना हा अपघात घडलाय. मोरवाच्या पुढे निघाले असताना अचानक त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला हा अपघात झाला. महत्त्वाचं म्हणजे, अपघातापूर्वी काही वेळेपूर्वीच हंसराज अहीर स्वत: या गाडीमध्ये होते.
अपघातापूर्वीच हंसराज अहीर एका गाडीतून उतरून दुसऱ्या गाडीत बसले होते... आणि त्यानंतर काही वेळतच ते अगोदर ज्या गाडीत बसले होते त्या गाडीला भीषण अपघात झाला. या गाडीत असलेला एक सुरक्षारक्षक आणि एक कार्यकर्ता जखमी झालेत. तसंच या कारचंही बरच नुकसान झालंय.
जखमींना तातडीनं जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलंय.