सूर्यनारायणाच्या आगीत होरपळतायत नागरिक!

मागील दोन दिवसापासून राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळते उष्णतेची ही लाट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही दिवसांपासून जोर धरलेल्या पूर्वमोसमी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. अंदमानात आणि बंगालच्या उपसागरात शनिवारी दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवासात प्रगती झालेली नाही. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

Updated: May 20, 2015, 04:01 PM IST
सूर्यनारायणाच्या आगीत होरपळतायत नागरिक! title=

मुंबई : मागील दोन दिवसापासून राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळते उष्णतेची ही लाट पुढील दोन ते तीन दिवस कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही दिवसांपासून जोर धरलेल्या पूर्वमोसमी पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे राज्यात आता पुन्हा उन्हाचे चटके बसू लागले आहेत. अंदमानात आणि बंगालच्या उपसागरात शनिवारी दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवासात प्रगती झालेली नाही. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.

विदर्भासह राजस्थान आणि मध्य प्रदेशात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी दोन दिवसात  पावसाची शक्यतादेखील हवामान खात्यानं वर्तवलीय. 

मे महिन्याच्या मध्यावर सूर्य अक्षरशः आग ओकू लागलाय. विदर्भातलं चित्र तर भयंकर आहे. नागपूरचं तापमान ४६.९ अंश सेल्सियस इतकं नोंदवलं गेलंय तर अमरावतीत साडे पंचेचाळीस डिग्री सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.

चंद्रपुरातील तापमानाही ४६.८ च्या पार गेलंय तर जळगावसह भुसावळ, अमळनेर, धरणगाव, पारोळा शहराचा पारा ४५ अंश डिग्री सेल्सियस एवढा नोंदला गेला.  जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, रावेर या ठिकाणी पारा ४४ अंश डिग्री सेल्सियसवर स्थिरावला. 

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून मे हीटचा जबरदस्त तडाखा नागरिकांना बसतोय, कामानिमित्त बाहेर पडणे अनिवार्य असल्याने उष्म्याची झळ नागरिकांना सोसावी लागतेय. वाढत्या उन्हामुळे तापाच्या रुग्णांतही वाढ झालीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.