नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...

लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात घडला... अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खिळखिळं झालं असलं तरी या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे जण सुखरुप आहेत.

Updated: May 25, 2017, 03:04 PM IST
नेमका कसा आणि का घडला मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात...  title=

मुंबई : लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात घडला... अपघातग्रस्त हेलिकॉप्टर खिळखिळं झालं असलं तरी या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत या हेलिकॉप्टरमध्ये असलेले सगळे जण सुखरुप आहेत.

कसा घडला अपघात

निलंग्याहून मुंबईला उड्डाण करण्यासाठी मुख्यमंत्री आपल्या टीमसहीत या हेलिकॉप्टरमध्ये दाखल झाले... हेलिकॉप्टर उड्डाण घेताना वातावरणातील हवा कमी झाली होती... त्यामुळे हेलिकॉप्टर आपोआप खाली येऊ लागलं... त्यामुळे प्रसंगावधान राखत हेलिकॉप्टरच्या कॅप्टननं हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपत्कालीन स्थितीत जमिनीवर उतरताना हेलिकॉप्टरचे पंखे तारांत अडकले... आणि हेलिकॉप्टर खाली कोसळलं, अशी माहिती हेलिकॉप्टरचे कॅप्टन कर्वे यांनी दिलीय. 

कोसळताना हेलिकॉप्टर कोलमडलं... ते खाली पडलं तिथे  एका बाजूला डीपी आणि दुसरीकडे ट्रक होता. या दोघांच्या मध्येच हेलिकॉप्टर उतरलं... शिवाय, जवळचं १०० मीटरवर एक ट्रान्सफॉर्मर (विजेचा डीपी) देखील होते... परंतु, थोडक्यात दुर्घटना टळली... आणि मुख्यमंत्री सुखरुप बचावले.  

कोण कोण होतं हेलिकॉप्टरमध्ये...

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- हेलिकॉप्टर कॅप्टन कर्वे आणि आणखी एक क्रू मेम्बर

- केतन पाठक - ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी)

- प्रवीणसिंह परदेशी - प्रधान सचिव सीएम ऑफीस 

- अभिमन्यू पवार - मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक (पीए)

असे एकूण सहा जण हेलिकॉप्टरमध्ये होते.