बोअरवेलमधून पाण्याऐवजी निघतंय पेट्रोल!

जमिनीतून कधी कुठून काय निघेल याचा नेम नाही. असाच काहीसा अजब प्रकार नांदेडमध्ये घडलाय. इथं खोदलेल्या बोअरवेलमधून पाण्याऐवजी चक्क पेट्रोल निघालंय. 

Updated: Nov 30, 2014, 02:18 PM IST
बोअरवेलमधून पाण्याऐवजी निघतंय पेट्रोल! title=

नांदेड: जमिनीतून कधी कुठून काय निघेल याचा नेम नाही. असाच काहीसा अजब प्रकार नांदेडमध्ये घडलाय. इथं खोदलेल्या बोअरवेलमधून पाण्याऐवजी चक्क पेट्रोल निघालंय. 

नांदेड जिल्ह्यातील रेल्वेस्टेशन परिसरामध्ये एक बोअरवेल खोदली गेली. तर त्यातून पेट्रोल सारखा पदार्थ समोर आला. सुरुवातीला पेट्रोल निघाल्यानंतर जमिनीतूनच पाण्यात पेट्रोल मिसळलं गेलं असेल, असं वाटलं होतं. म्हणूनच बोअरमधील पाण्याचा बराच उपसा करण्यात आला. तर त्या द्रवपदार्थाला ठिणगी लागताच भडका उडाला. त्यावरून हा पदार्थ पेट्रोल असल्याचाच निष्कर्ष काढण्यात आलाय. 

ही घटना समजताच तहसील कार्यालयानं घटनास्थळी भेट दिली असून पाण्याचा वापर करु नये असं लेखी पत्र प्रशासनातर्फे बोअरवेलच्या मालकाला दिलं आहे. मात्र या घटनेमुळं नांदेडमध्ये चर्चेला उत आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.