जळगाव : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची 21 मार्चला निवड होतेय. भाजपने आपल्या सदस्यांना रविवारी रात्री सदस्य सहलीला पाठवले आहे. 67 जागांपैकी 33 जागांवर भाजपाला यश आलंय. तर शिवसेना 14, राष्ट्रवादी 16 तर काँग्रेसने चार जागा मिळविल्यात. भाजपाला सत्ता स्थापनेकरिता एका सदस्यांची गरज भासतेय.
गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत एकत्र राहिलेल्या शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत यावेळी सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी भाजपने यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीचे सदस्य गळाला लावून मोठी राजकीय खेळी खेळलीय.
संख्याबळ पूर्ण करण्यासाठी एका सदस्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावून विरोधी सदस्यांची पळवापळवी सुरु केलीय. आपल्याकडे 38 ते 40 संख्याबळ असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केलाय.