रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल उद्योग समूह जनतेसह सरकारचीही फसवणूक करत असल्याचे पुढे आलेय. याबाबत मुख्यमंत्र्याना निवेदन देण्यात आले आहे.
निवळी जयगड मार्गाचं चौपदरीकरण करणं गरजेचं असताना रस्ता मजबुतीकरण करण्याचं काम कंपनीने ठेकेदारांना दिला आहे. तसेच जिंदाल कंपनीने इंडोनेशियातील वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा घेणं बंद केलं असून आता दक्षिण आफ्रिकेतून कमी दर्जाचा कोळसा वीज निर्मितीसाठी वापरत आहेत त्यामुळे या ठिकाणी आता प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याचा आरोप भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे.
जयगड येथील जनतेवर आणि तरूणांवर या कंपनीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. कारण कंपनीच्या चुकीच्या धोरणामुळे या ठिकाणीचे ट्रक व्यावसायिकांना आपलं सर्वस्व कर्जामुळे गमवावं लागलंय. तसेच जिंदाल पोर्टचे अधिकारी कॅप्टन शर्मा यांच्या मनमानी कारभारामुळेच निवळी जयगड रस्त्याचं चौपदरीकरण होत नाही, असा आऱोपही बाळ माने यांनी केला आहे.
यासंर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. याद्वारे जिंदाल कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे. याप्रकरणी जिंदाल कंपनी संपर्क साधला असता याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास कंपनीनं टाळले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.