विशाल वैद्य, कल्याण : कल्याणमध्ये एका महिलेनं पोटच्या मुलीला बेदम मारहाण केली. या मुलीचे हात बांधून तिच्या गळ्यात गळफास लावण्यात आला. मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यांवरही या महिलेनं हल्ला केला
शेजाऱ्यांनी पाहिलं तेव्हा या मुलीचे हात कपड्यानं करकचून बांधलेले होते... गळ्यात गळफस लावण्यात आला होता... चोरिच्या संशयावरुन तिला ही अघोरी शिक्षा देण्यात आली होती... आणि ही शिक्षा दिली होती तिच्याच आईनंच...
अत्यंच चीड आणणारा हा प्रकार घडलाय कल्याणमध्ये... सुदैवानं शेजाऱ्यांचं या प्रकाराकडे लक्ष गेलं आणि त्यांनी या मुलीची तिच्या सैनाती आईच्या तावडीतून सुटका केली... या सगळ्या प्रकाराचं त्यांनी मोबाईद्वारे चित्रीकरणही केलं.
या कोळव्या मुलीला केवळ एकच दिवस अशी शिक्षा केली गेली नव्हती.. तर गेल्या महिनाभरासून तिला मारहाण केली जात होती.. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरुन या सैतानी मातेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
खरं तर आई या शब्दात मुलांचं सारं विश्व सामावलेलं असतं. मात्र, चोरीच्या संशयावरुन पोटच्या पोरीला अशी अघोरी शिक्षा करणा-या या सैतानी आईला माता न तू वैरिणीच म्हणावी लागेल.