पुणे : विधानसभेनं हक्काभंगाची शिफारस केल्यानंतर पुणे विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी थेट स्वेच्छा निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्याला हक्कभंगाची कारवाई मान्य असल्याचं सांगत त्यांनी झी 24 तासशी बोलताना ही घोषणा केली. त्यामुळं आणखी एका कर्तव्यदक्ष अधि-याचा व्यवस्थेनं बळी घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे.
चंद्रकांत गुडेवार यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस विधानसभा हक्कभंग समितीने केलीय. अवमान प्रकरणी गुडेवार यांच्याविरोधात आमदार सुनील देशमुख यांनी हक्कभंग दाखल केला होता. गुडेवार यांना सभागृहासमोर बोलवून समज द्यावी आणि एक दिवसाची शिक्षा तसेच यापुढील काळात गुडेवार यांना कोणत्याही कार्यकारी पदावर नियुक्ती करू नये अशा शिक्षांची शिफारस अहवालात केलीय. तसेच सभागृहाने अहवाल स्वीकारल्याने गुडेवार यांच्यावर कारवाई होणार आहे.