मुजोर फेरीवाल्यांवर कल्याण मनपाची आक्रमक कारवाई

कल्याणमध्ये पुन्हा एकदा फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जुंपलीय. मंगळवारी महापालिकेची कारवाई सुरू असताना महापालिका कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली.  

Updated: Aug 31, 2016, 05:40 PM IST
मुजोर फेरीवाल्यांवर कल्याण मनपाची आक्रमक कारवाई

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा एकदा फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये जुंपलीय. मंगळवारी महापालिकेची कारवाई सुरू असताना महापालिका कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांनी मारहाण केली.  

कल्याणमधल्या शिवाजी चौक ते रेल्वे स्थानक या परिसरातल्या नव्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यांना हटवतण्याची कारवाई सुरू होती.  त्यावेळी महापालिका कर्मचारी संतोष जोंधळे यांना गुलाब दळवी आणि तिची मुलगी दीपाली दळवी या महिला फेरीवाल्यांनी मारहाण केली. 

या घटनेनंतर लगेचच महापालिकेचं कारवाई पथकही फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झालं. हातात हातोडे, काठया घेऊन पोलीस संरक्षणात माहापालिकेच्या पथकानं फेरीवाल्यांच्या मालाची नासधूस आणि सामानाची तो़डफोड केली.  

महापालिका कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडलं. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.  यापुढेही अशीच आक्रमक कारवाई करणार असल्याचा इशारा महापालिकेनं दिलाय.