रत्नागिरी : पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेची पुर्नरावृत्ती खेड तालुक्यात पाहायला मिळाली. कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असून नातूनगरमधील तुळशी विन्हेरे- महाड मार्गावरील घुबरवाडी येथे ही दरड कोसळून दोन वृद्धांचा मृत्यू झाला.
पावसामुळे पूर्णत: डोंगर खचला. कोसळलेल्या दरडीत तुळशी गावातील भागोजी रामजी सुतार आणि परशुराम शिवराम सुतार या वृद्धांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तब्बल १२ तासांनंतर आपत्ती व्यवस्थापनाची टीम ही दरड काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. दरड कोसळल्याचे कळवूनही प्रशानसाने दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
दरडीचा धोका कायम आहे. त्यामुळे येथील काही घरांचे स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे. नातूनगरच्या डोंगराला भेगा पडल्या असून काही ठिकाणी जमीन खचली आहे. त्यामुळे धोका कायम असल्याने ग्रामस्थांनी सांगितले.
या घटने संदर्भात रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळारी सायंकाळी आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक बोलवली. दरम्यान, रत्नागिरीपासून ८ किमी अंतरावर जमीन खचण्याचा प्रकार गेली दोन ते तीन वर्षांपासून सुरु आहे. त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. त्यामुळे मोठी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.