चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.  

Updated: Jan 7, 2016, 02:13 PM IST
चंद्रपुरात दारुबंदी कायम; कारखानदारांची याचिका फेटाळली title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी कायम राहणार आहे. दारु कारखानदारांची याचिका हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं फेटाळून लावलीय. दारुबंदीला स्थगिती देण्यास कोर्टानं नकार दिलाय. गेल्या वर्षी ही दारुबंदी लागू करण्यात आलीय.  
 
चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदीचा घटनाक्रम... 

> चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदीची मागणी 

> २०१० च्या हिवाळी अधिवेशनात महिला संघटनांनी हजारो महिलांचा विधानसभेवर मोर्चा काढला (चिमूर ते नागपूर)

> २२ फेब्रु २०११ ला राज्य सरकारने चंद्रपूरचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली 

> समितीचा अहवाल आला पण कुठलाच निर्णय नाही 

> भाजपने निवडणुकीत दारूबंदीचे आश्वासन दिले

> २० जानेवारी २०१५ ला कॅबिनेटनं दारूबंदीचा निर्णय घेतला

> चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू 

> प्रशासनाने जिल्ह्यातील ५१३ दारूविक्री करणाऱ्या दुकानांना सील ठोकलं

> या विरोधात हायकोर्ट (नागपूर खंडपीठ ) याचिका दाखल करण्यात आल्या 

> आज या याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळल्या.