लोणावळा: लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये 15 फेब्रुवारीला 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या हत्येच्या आरोपीचं छायाचित्र पोलिसांनी प्रसिद्ध केलंय.
15 फेब्रुवारीला बलात्कारानंतर चिमुरडीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील मुख्य आरोपी संतोष रॉय हा तेव्हापासून फरार असून पोलिसांनी त्याचं छायाचित्र प्रसिध्द केलं आहे. या घटनेतील दुसरा आरोपी अजय शकर दोधाड याला यापुर्वीच लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी संतोष रॉय याचा या गुन्हयातील सहभाग निच्छित करण्यासाठी त्याच्या आईच्या रक्ताचा नमुना घेऊन डिएनए चाचणी करण्यात आली. सदर चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याच्यावरील गुन्हा निच्छित झाला आहे.
मात्र तो फरार असल्यानं पोलिसांनी त्याचं छायाचित्र प्रसिध्द केलं असून तसे पोस्टर विविध पोलीस स्टेशन तसंच सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.