मडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार

मडगाव ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

Updated: Nov 6, 2015, 05:23 PM IST
मडगाव ते दिल्ली राजधानी एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावर धावणार title=

मुंबई : गोवातील मडगाव ते नवी दिल्ली, अशी राजधानी एक्सप्रेस गाडी कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात येणार आहे. ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.

राजधानी एक्सप्रेस या सुपरफास्ट गाडीला करमाळी, रत्नागिरी, पनवेल आणि वसई रोड येथे थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वेवर नवी सुपर फास्ट गाडी सुरु करण्यात येत असल्याने कोकणातील प्रवाशांना लाभ मिळणार आहे. ही गाडी १५ नोव्हेंबरपासून धावणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.