बेपत्ता 'जय' वाघाची शिकार?

उमरेड अभयारण्यातील बेपत्ता वाघ 'जय'चा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याची शिकार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Updated: Aug 17, 2016, 03:32 PM IST
बेपत्ता 'जय' वाघाची शिकार? title=

भंडारा : उमरेड अभयारण्यातील बेपत्ता वाघ 'जय'चा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्याची शिकार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेले पाच महिने जय बेपत्ता आहे. त्याचा कसून शोध घेण्यात आला. पण तो जिवंत किंवा मृत असल्याचे पुरावे वनविभागाला सापडलेले नाहीत. जयची शिकार झाल्याच्या संशयावरुन पवनी तालुक्यातल्या कोदुर्ली गावातून दोन शिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.  त्यांच्याकडून शिकारीचे सापळे जप्त करण्यात आले आहेत.

भंडाऱ्यातल्या उमरेड करांडलामधला जय हा अतिशय उमदा वाघ होता. त्याला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी व्हायची. आशियातल्या सर्वात मोठ्या वाघांपैकी जय एक समजला जायचा.