ठाणे : आमदार किसन कथोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. किसन कथोरे हे मुरबाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आहेत.
पक्षात आपली घुसमट होत असल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे किसन कथोरे यांनी म्हटलं आहे. आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर उद्या आपण आमदारकीचाही राजीनामा देणार असल्याचे संकेत किसन कथोरे यांनी दिले आहेत.
कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करुन पुढील निर्णय घेणार असल्याचं किसन कथोरे यांनी स्पष्ट केलं आहे.कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांनीही आपले राजीनामे सोपवले असल्याचं सांगण्यात येत आहे.
यासोबत मुरबाड, अंबरनाथ पंचायत समिती सदस्यांचेही राजीनामे, विविध ग्रामपंचायत सदस्यांनीही राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीत सूर्यकांता पाटील, विजय कांबळेंनंतर
आता किसन कथोरेंनीही राजीनामा दिल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी गळती लागली असल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.