वेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे

वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.

Updated: Aug 24, 2014, 07:24 PM IST
वेगळ्या विदर्भाला माझा विरोध - राज ठाकरे title=

नागपूर : वेगळ्या विदर्भाला माझा विरोध आहे, विदर्भाचा विकास ज्यांनी केला नाही, त्याचा राज्याला त्रास का, यासाठी राज्याचे तुकडे पाडणे हा उपाय असू शकत नाही, ज्यांनी विकास केला नाही, त्याची शिक्षा संपूर्ण महाराष्ट्राला कशी देणार, असं राज यांनी म्हटलंय.

महाराष्ट्रात अनेक प्रांत आहेत. या सर्वांनी वेगळं व्हायचं म्हटलं तर चालेलं का? असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी केला.

ठाकरे घराण्यात अजून कुणीही निवडणूक लढवली नाही, माझं निवडणूक लढवणं अजून निश्चित नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदार संघ असल्याचं  राज ठाकरे यांनी नागपुरात सांगितलं.

तसेच यावेळी कुठल्याही इच्छुकांच्या आपण परीक्षा घेणार नसल्याचंही यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मनसे विदर्भातून यावेळी 40 ते 45 जागा लढवणार आहे, अशी माहिती राज यांनी दिली.

महाराष्ट्र राज्याच्या विकासाची ब्लू प्रिन्ट येत्या दहा दिवसात प्रकाशित करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

हुर्रे होत असेल तर मोदींच्या सभेला मुख्यमंत्र्यांनी न गेलेलचं बरं असंही राज यांनी म्हटलंय. मोदी उपस्थित असलेल्या सभेत काँग्रेस नेत्यांना हुटिंग केलं जातं, यावर राज ठाकरे बोलत होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.