नाशकात मनसे कामाला, राज ठाकरे दौऱ्यावर

मनसे पुन्हा कामाला लागलीय. अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा सुरू आहे. पण नुसते दौ-याचे फार्स नकोत, विकास करुन दाखवा, अशी नाशिककरांची मागणी आहे.

Updated: Apr 2, 2015, 08:04 PM IST
नाशकात मनसे कामाला, राज ठाकरे दौऱ्यावर title=

नाशिक : मनसे पुन्हा कामाला लागलीय. अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा सुरू आहे. पण नुसते दौ-याचे फार्स नकोत, विकास करुन दाखवा, अशी नाशिककरांची मागणी आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आज पुन्हा नाशिकमधल्या रस्त्यांवरून फिरला. दौ-याची सुरूवात अर्थातच महत्त्वाकांक्षी गोदापार्कपासूनच झाली. गोदापार्कच्या कामाची पाहाणी करून मुंबई नाका परिसरातल्या नियोजीत चिल्ड्रन पार्कताही त्यांनी आढावा घेतला. 

राज यांच्यासह फिरून अमित ठाकरे यांनीही यावेळी राजकारणाचे धडे गिरवले. शहरातल्या रस्त्यांचीही राज ठाकरे यांनी पाहाणी केली. पावसाळ्यात रस्त्यावर खडी चिखल साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना राज ठाकरे यांनी अधिका-यांना केल्या. 

राज ठाकरे यांचं गोदापार्कचं स्वप्न साकार होत असलं तरी नाशिककरांचीही काही विकासाची स्वप्न अपूर्ण आहेत. शहरातल्या नागरिकांना मुलभूत सोयीसुविधा कधी मिळणार, पाणीटंचाई कशी दूर होणार, घाण कचरा घंटागाडीच्या समस्यांपासून कधी मुक्ती मिळणार असा सवाल नाशिककर विचारत आहेत. 

नाशिककरांची नाराजी आणि विरोधकांच्या टीकेचा सामना करणाऱ्या मनसेन आता कागदावर नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरवात केलीय असं सध्याचं चित्र आहे. शहर सुशोभीकरणावर सगळा भर राहणार आहे. नाशिक शहरातील सर्व वाहतूक बेटं सुशोभित केली जाणार असून खाजगी विकसकांच्या माध्यमातून उद्यानांची देखभाल केली जाणार आहे. 

शहरात येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर वृक्षांच्या माध्यमातून सजावट हिरवळ तयार करण्याचा राज ठाकरे यांचा मानस आहे. अर्थात कुंभमेळ्याच्या तयारीत अडकलेल्या प्रशासनाकडून नवनिर्माणाची सुशोभिकरणाची ही काम पूर्ण होणार का असा सवाल उपस्थित होतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.