पुणे - मुंबई एक्प्रेस-वेवरील टोलचा झोल, १५० कोटींचे नुकसान

 पुणे - मुंबई एक्प्रेस-वेवरील टोलचा झोल प्रत्येक वेळी नवीन रुपात समोर येतोय.  

Updated: Jan 20, 2016, 10:00 PM IST
पुणे - मुंबई एक्प्रेस-वेवरील टोलचा झोल,  १५० कोटींचे नुकसान title=
संग्रहित

पुणे :  पुणे - मुंबई एक्प्रेस-वेवरील टोलचा झोल प्रत्येक वेळी नवीन रुपात समोर येतोय. या रस्त्यावरील टोल नाक्यांवरून पास होणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी तफावत समोर आलीय. त्यामुळे १५० कोटींचे नुकसान सोसावे लागलेय.

कंत्राटदाराकडील आकडेवारी आणि रस्ते विकास महामंडळाच्या पाहणीतील आकडेवारीत मोठा फरक आहे. कंत्राटदार सुमारे ५० टक्के वाहनांची नोंद दडवत असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय.यामुळे सरकारचं वर्षाकाठी सरासरी दीडशे कोटींचं नुकसान होत असल्याचा दावाही करण्यात आलाय.

सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि टोल विरोधी कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी याबाबतची माहिती मिळवली आहे. गेल्या १० वर्षात सरकारचं सुमारे दीड हजार कोटींचं नुकसान झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केलाय. या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वेलणकर आणि शिरोडकर यांनी केलीय. 

दरम्यान एक्प्रेस वे वरून टोल  माफ असलेली सरकारी वाहने तसेच पास धारक वाहनांची ये - जा होत असल्यानं कंत्राटदार आणि महामंडळाच्या आकडेवारीमध्ये तफावत दिसत असल्याचं महामंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलय. तीन दिवसांतली  एक्स्प्रेसवेवरील टोल देणा-या वाहनांच्या आकडेवारीच्या तफावत दिसत आहे.