शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट, ५ संशयित ताब्यात

शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट झालीय. पहाटे दीड ते दोनच्या दरम्यानची ही घटना आहे. चितळी स्टेशनवर महिलांचे दागिने लुटून चोर पसार झाले.

Updated: May 27, 2015, 01:24 PM IST
शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट, ५ संशयित ताब्यात title=

मनमाड: शिर्डी-म्हैसूर एक्सप्रेसमध्ये लूट झालीय. पहाटे दीड ते दोनच्या दरम्यानची ही घटना आहे. चितळी स्टेशनवर महिलांचे दागिने लुटून चोर पसार झाले.

साखळी ओढून ट्रेन थांबवत चोर पळाले, घटनेनंतर जवळपास अडीच तास एकाच जागी ट्रेन उभी राहिली. मनमाड लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्याचं काम सुरु असून ७ ते ८ जणांच्या या चोरट्यांच्या टोळक्यात महिलांचाही समावेश असल्याचं समजतंय.

दरम्यान, ५ संशयितांना श्रीरामपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.