नालासोपारा : मुंबई जवळील नालासोपारा येथे व्यावसायिक प्रतिस्पर्धेतून जमिनिचा व्यवहार करणाऱ्या एका तरूणावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. गोळीबारात हा तरुण गंभीर जखमी झालाय.
एव्हरशाईन परिसरात रात्री मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या जावेद अन्सारीवर तीन अज्ञातांनी गोळीबार केलाय. यात जावेदला तीन गोळ्या लागल्या असून त्याच्यावर वसईच्या आयसीसी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जावेद अन्सारीला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे हल्ला त्याच्या माहितीतल्या व्यक्तींपैकीच कुणीतरी केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. दोनच दिवसांपूर्वी भांईंदरमध्ये अजय गुप्त नावाच्या तरूणावर त्याच्या मित्रानंच गोळीबार केला होता. अवघ्या ४८ तासात घडलेल्या या घटनेमुळे नालासोपारा, वसई, भाईंदर परिसरात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उभं राहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.