रत्नागिरी : काँग्रेसचे नेते नारायण राणे पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनेलाही टोला लगावला. काँग्रेसने आज रत्नागिरीत राज्यसरकारविरोधा मोर्चा काढत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे रोमँटिक मुख्यमंत्री, असे उद्गार राणे यांनी यावेळी काढले
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोशल मीडियावरील छायाचित्र धागा पकडत नारायण राणे यांनी शुक्रवारी फडणवीस यांच्यावर तोफ डागली. फडणवीस अमेरिकेत जाऊन रोमॅंटिक हिरो, अशी स्वतःची प्रतिमा तयार करीत असले, तरी ते हिरो आहेत की व्हिलन हे ठरवावे लागेल, अशी टीका राणे यांनी केली.
वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसकडून शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. फडणवीस यांनी अमेरिकेत जाऊन स्वतःची रोमॅंटिक हिरो, अशी प्रतिमा निर्माण केली. बोटीवर जाऊन कुटुंबीयांसमवेत स्वतःचे फोटो काढले. पण ते हिरो आहेत की व्हिलन ते एकदा ठरवावे लागेल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याने निर्माण केलेली प्रतिमा फडणवीस यांनी धुळीस मिळवली आहे, असे राणे म्हणाले.
भेसळ म्हणजे चिक्की. चिक्की म्हणजे भापचे मंत्री. शिवसेना भाजपामधील सर्वच मंत्री भ्रष्टाचारी आहेत. एकानेही सांगावं मी भ्रष्टाचारी नाही. सगळ्या मंत्र्यांच्या कुंडल्या माझ्या हाती आहेत, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.