नाशिक : नाशिकच्या टोईंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी चिरीमीरी घेतात, उर्मठ वागतात. अशा अनेक तक्रारी नाशिककरांनी केल्या, त्यामुळे या कर्मचा-यांवर वचक ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
यासाठी टोइंग व्हँनलाच सीसीटीव्ही कँमेरा आणि माईक सिस्टीम बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलाय. शिवाय वाहन उलण्यापूर्वी कर्मचा-यांनी लाऊडस्पीकरवरुन इशारा देण्यासंदर्भात सूचना करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
त्यानंतर कमीतकमी पाच मिनिटं वाट बघून वाहन उचलण्याचे निर्देश देण्यात वाहतूक शाखेकडून देण्यात आलेत.