मृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला मदतीची गरज

दंगलींसारख्या काही घटनांमुळे सध्या सोशल मीडिया बदनाम झाली आहे. मात्र मृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला आर्थिक मदतीची गरज आहे. शीतलवर आणखी उपचारांची गरज आहे, आठ लाख रूपये शीतलच्या उपचारांसाठी खर्च येणार असल्याचं सांगण्यात येतंय. पूना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारी शीतलला आणखी मदतीची गरज आहे.

Updated: Jun 24, 2014, 04:52 PM IST
मृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला मदतीची गरज  title=

पुणे : दंगलींसारख्या काही घटनांमुळे सध्या सोशल मीडिया बदनाम झाली आहे. मात्र मृत्यूशी झुंज देणाऱ्या शीतलला आर्थिक मदतीची गरज आहे. शीतलवर आणखी उपचारांची गरज आहे, आठ लाख रूपये शीतलच्या उपचारांसाठी खर्च येणार असल्याचं सांगण्यात येतंय. पूना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देणारी शीतलला आणखी मदतीची गरज आहे.

शीतलची दुर्देवी कहाणी
पुणे जिल्ह्यातील कवठे येमाई तालुका शिरूर हे शीतल फकिरा सांडभोर या चौदा वर्षाच्या मुलीचं गावं आहे. शीतलला 76 टक्के गुण मिळाल्याची बातमी ती आपल्या वडिलांना सांगण्यासाठी गेली, वडील उसाच्या गुऱ्हाळावर काम करत होते.

वडिल ग्राहकांना रस देण्याच्या कामात होते. दरम्यान क्रशरच्या मोटारीजवळ उभ्या राहिलेल्या शीतलचा तोल गेला, शीतल खाली पडली, पण तिचे केस मोटारीत ओढले गेले. या घटनेत शीतलचे कातडीपासून केस आणि एक कान शरीरापासून वेगळा झाला.

शीतललला पूना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय, तिला उपचारांसाठी आठ लाखांची गरज आहे

तुम्हाला मदत करायची असेल तर
शीतलची ही करूण कहाणी फेसबुक आणि व्हॉटसअेपवर फिरतेय. ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी "फकिरा बाळासाहेब सांडभोर‘ या नावाने धनादेश काढून रुग्णालयाच्या अथवा मु. पो. कवठे येमाई, ता. शिरूर, जि. पुणे या पत्त्यावर पाठवावा. 

ऑनलाइन मदत पाठविण्यासाठी -
Mr.SANDBHOR FAKIRA BALASAHEB 
BANK-SYNDICATE BANK
KAVATHE SHIRUR PIN-412218
AC NO-53302200008689
IFSC -SYNB0005330
संपर्क - बाळू मारुती सांडभोर - 9860378929.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.