धुळे : धुळे शहरातील नटराज टॉकीज समोर पोलिसांनी ५० लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्यात. चलनातून रद्द झालेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांचा यामध्ये समावेश आहे.
शहादा शहराकडून नाशिककडे ही रोकड नेण्यात येत असताना धुळ्यातील आझाद नगर पोलिसांनी ही कारवाई केलीय. याप्रकरणी पोलिसांनी 3 संशयितांना ताब्यात घेतलंय. या संशयितांकडून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.