पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या

महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.

Updated: Aug 13, 2015, 12:55 PM IST
पंकजा मुंडे यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्या title=

परभणी : महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे-पालवे पुन्हा एकदा अडचणीत आल्यात आहेत. पंकजा यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचल्याने नवा वाद उभा राहिला आहे. आधी चिक्की घोटाळ्यामुळे त्या चर्चेत होत्या.

पंकजा मुंडे-पालवे यांनी काल दुष्काळी भागाच्या दौरा केला. त्यावेळी त्यांच्या चपला त्यांच्या कर्मचाऱ्याने उचलल्याचे समोर आल्य आहे. पंकजा यांनी परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, त्यावेळी चिखल असलेल्या रस्त्यावरून जाताना चप्पल काढून ठेवली. ही चपल कर्मचाऱ्याला हातात घ्यावी लागली.

 या नव्या प्रकरणामुळे विरोधकांनी पंकजा मुंडे-पालवे यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या पंकजा यांचा हा थाट, हे वर्तन आक्षेपार्ह असून यावरून सरकारची मानसिकता लक्षात येते, अशी बोचरी टीका काँग्रेसनी केली आहे.

 हे सरकार गरीबांचे कसे आहे का? सरकारमधील मंत्रीच सामान्य गरिब व्यक्तीला आपली चप्पल उचलायला लावतात, ते इतरांच भलं कसं करणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी हा आरोप फेटाळून लावली. आपली चप्पल उचलणारी व्यक्ती म्हणजे आपला खासगी कर्मचारी असल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.