पुणे : छेड काढणा-याला चोप दिल्याचा राग मनात ठेऊन आरोपीनं दुस-या दिवशी या मुलीला कटरनं भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. मुलीच्या तक्रारीरनंतर पोलिसांनी 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. पुण्यातल्या सदाशीव पेठेमध्ये ही घटना घडली आहे.
देवदास भीमाप्पा मरटी या 45 वर्षीय इसमानं अल्पवयीन मुलगी शाळेतून येत असताना तिच्याकडे आणि तिच्या मैत्रिणीकडे पाहून शिटी वाजवली गाणं म्हटलं. त्यानंतर त्या मुलींनी त्याचा पाठलाग करून त्याला चपलेनं चोप दिला. यावेळी जमलेल्या नागरिकांनीही त्याला चोप दिला.
देवदासला याचा राग आल्यानं दुस-या दिवशी या मुलीला गाठलं आणि तिच्यावर कटरनं वार केले. या मुलीला पोटाला गंभीर दुखापत झाली. तिच्या मैत्रिणींनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. विश्रामबाग पोलिसांनी ज्या परिसरात ही घटना घडली त्या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपीला अटक केली.