कोल्हापूर : भाजपच्या नगरसेवकाच्या आणि त्यांच्या मुलांच्या धमक्यांना कंटाळून एका फोटोग्राफरनं आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलीय.
शहरातल्या खरी कॉर्नर इथल्या आनंदराव चौगुले या वृद्ध फोटोग्राफरनं गळफास घेउन आत्महत्या केलीय. पालिका निवडणुकीतल्या वादातून त्यानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
आनंदराव चौगुले यांच्या खिशात सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाईड नोटमध्ये भाजपचे नगरसेवक आणि त्यांच्या मुलाच्या धमक्यांना घाबरुन आपण आत्महत्या करत असल्याचा चौगुले यांनी स्पष्ट उल्लेख केलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.