उरण : सेझच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात जुगलबंदी रंगली. केंद्राच्या काही करप्रणालीमुळे महाराष्ट्रात मंजूर झालेल्या १४६ पैकी अनेक सेझ प्रकल्प रखडलेत. त्यामुळे तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.. त्यावर प्रत्युत्तर देताना पंतप्रधानांनी पृथ्वीराज चव्हाणांना चिमटा काढला.. मुख्यमंत्री आधीच्या सरकारला हे असं काही सांगतं नव्हते असं पंतप्रधानांनी सुनावलं..
सोलापुरात दोन प्रकल्पाचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज महाराष्ट्र दौ-यात उदघाटनं आणि भूमीपूजनांचा दणका उडवून दिला. दक्षिण सोलापुरातल्या लिंबी, चिंचोळी इथे नॅशनल पॉवर ग्रीड प्रकल्पाचं आणि सोलापूर पुणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचं उदघाटन मोदींनी केलं. सोलापूरकरांचा उत्साह कमी झालेला नाही. सोलापूरकरांच्या प्रेमाची परतफेड व्याजासकट करू असं मोदी म्हणाले. दुष्काळामुळे महाराष्ट्रातली जलविद्युत थंडावली आहे. त्यामुळे केंद्राकडून पुरेसा कोळसा मिळावं अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. महाराष्ट्राला पुरेशी वीज आणि कोळसा नक्की मिळेल असं मोदींनी आश्वासन दिलं खरं.. पण हे सांगताना त्यांनी मुख्यमंत्र्य़ांना चांगलाच टोला लगावला.
रायगडमध्ये जेएनपीटीच्या प्रकल्पाचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रायगडमध्ये पहिलाच जाहीर कार्यक्रम झाला.जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट अंतर्गत होत असलेल्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. सुमारे 1900 कोटी रुपये खर्चाचा पोर्ट कनेक्टिव्हिटी महामार्ग प्रकल्प आणि जेएनपीटी परिसरातल्या ६००० कोटी रूपयांचा 277 एकर जमिनीवरील विशेष आर्थिक क्षेत्र प्रकल्प या दोन्हींचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. या कार्यक्रमादरम्यान दरम्यान प्रकल्पग्रस्तांना 12.5 टक्क्यांच्या योजनेतील भूखंडाचे वितरणही पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्यात आलं.. भूमीपुत्रांना रोजगार मिळावा हा एकमेव उद्देश या प्रकल्पांमागे असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
देशी बनावटीच्या विनाशिकेचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत आज दोन महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले. माझगाव डॉक येथे संपूर्ण स्वदेशी बनावटीची विनाशिका आयएनएस कोलकाताचं लोकार्पण झालं. तर नवी मुंबईत जेएनपीटीच्या सेझचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. प्रकल्पबाधितांना साडेबारा टक्क्यांच्या योजनेतील भूखंडाचे वितरणही करण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.