ठाणे : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईचा जल्लोष असतो. मात्र, दारू ढोसणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केलेय. तशी गस्तच सुरुच ठेवली आहे.
ख्रिसमस ते ३१ डिसेंबर हे दिवस म्हणजे तळीरामांसाठी सणासुदीचेच दिवस. त्यात तळिरामांना खरा चेव येतोत तो नववर्षाच्या स्वागताच्या दिवशी. म्हणून या दिवसांत पोलिसांना खास नजर ठेवावी लागते. ठाण्यात पोलिसांनी अशा तळीरामांवर धडक कारवाई सुरु केली आहे. यात ठाणे पोलिसांनी आपली कारवाई काहीश्या हटके पद्दतीनं सुरु केली आहे.
न्यू ईयर सेलीब्रेशन म्हणजे तलळीरामांचा सण. अशात दारु पीऊन बेदरकारपणे गाडी चालवल्यानं अपघातांची संख्या वाढते. अपघात टाळण्यासाठी सध्या पोलिसांची रात्रंदिवस गस्त सुरु आहे. ठाणे वाहतूक पोलिसांही यंदा विशेष मोहीम उघडली आहे.
मात्र ही मोहीम काहीशी वेगळी आहे. नववर्षाची सुरुवात अपघात विरहीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिसांनी बार मालकांची बैठक बोलावली. आणि त्यांच्याकडे येणा-या ग्राहकांना परत जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्यात.
शहरांमधील विविध नाक्यानाक्यांवर वाहतूक पोलिसांचे पथक फिरणार आहे. हे पथक श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्यपी चालकांची तपासणी करणार आहे. याशिवाय, येऊरच्या पायथ्याशी वाहतूक पोलिसांचे पथक उभे राहणार असून तिथे चालकांची तपासणी करणार आहे.
इतकच नव्हे तर एरव्ही तुम्ही दारु पियून गाडी चालवली तर तुमच्यावर कारावई होते. मात्र ठाणे पोलिसांनी त्यात आणखीन भर टाकली आहे. जर तुम्ही दारु पिउन गाडी चालवणा-याच्या सोबत प्रवास करताना सापडले तरीसुद्धा तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.