कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : मोठ्या घडामोडीनंतर पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये झाला. पण आता त्याच्यावरून ही राजकारण सुरु झालंय. भाजपने हे निवडणुकीसाठी जनतेला दिलेलं गाजर असल्याची टीका विरोधकांनी सुरु केलीय...!
काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पात्रता असून ही पिंपरी चिंचवड शहराचा समावेश झाला नाही त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारवर विरोधकांनी जोरदार टीका केली...! पण आता शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालाय...खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आणि निवडणुकांपूर्वीच झालेल्या या घोषणेमुळं पिंपरी भाजपने ही तातडीने पत्रकार परिषद घेत या निर्णयाची माहिती दिली...!
भाजप ने निवडणुकी पूर्वीची वेळ साधल्याने विरोधकांनी त्यावर आता जोरदार टीका सुरु केलीय..निवडुकांपूर्वी भाजप ने पिंपरी चिंचवड करांना गाजर दिलंय अशी टीका राष्ट्रवादीने केलीय. तर मनसे ने ही भाजप ची ही स्टंट बाजी असल्याचं म्हटलंय...
महापालिका निवडणुका डोळ्या समोर पिंपरी चिंचवडचा समावेश झाला असेल हे सांगायला कोण्या ज्योतिषाची गरज नाही. पण उशिरा का होईना समावेश झाला हे ही नसे थोडके...!