पुणे पोलिसांसमोर माधुरीचं सौंदर्य उणे

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पुणे पोलिसांनी दंड ठोठावला आहे, लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने पुणे पोलिसांनी माधुरी दीक्षितला दंड ठोठावला आहे. 

Updated: Sep 11, 2014, 09:26 PM IST
पुणे पोलिसांसमोर माधुरीचं सौंदर्य उणे title=

पुणे : धकधक गर्ल माधुरी दीक्षितला पुणे पोलिसांनी दंड ठोठावला आहे, लक्ष्मी रोडवर नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याने पुणे पोलिसांनी माधुरी दीक्षितला दंड ठोठावला आहे. 

माधुरी दीक्षितच्या सौंदर्यांची अनेकांना भुरळ पडते, मात्र पुणे पोलिसांच्या वाहतुकीच्या नियमासमोर हे सौंदर्यं उणेच म्हणावे लागेल. माधुरीला पुणे पोलिसांनी २०० रूपयांचा दंड ठोठावला आहे. 

माधुरी दीक्षित एका कार्यक्रमासाठी पुण्यात आली होती. त्यावेळी तिने लक्ष्मीरोडवर नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केल्याने तिला २०० रूपये दंड भरावा लागला. पुणे वाहतूक पोलिसांनी आज संध्याकाळी ही कारवाई केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.