रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशार हवामान खात्यानं दिलाय. तर 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं किनावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी झालीय. सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु आहे.
गेल्य़ा 24 तासात जिल्ह्यात सरासरी 123मिमी पाऊस झाला. जिल्हातील चिपळूणमधील वाशिष्ठी आणि खेडमधील जगबुडी नद्या दुथडी भरुन वाहतायत. अर्जुनाना पूर आल्याने पेठ भागातले नागरिक होडीतून राजापूर शहरात येत आहेत. संगमेश्वरमध्ये शास्त्रीनदीलाही पूर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली पावसाचा जोर कायम आहे. मालवण मधल्या ब-याच घरांमध्ये पाणी शिरलंय. कांदळगावातल्या शाळेवर झाड पडलं. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय. सकाळपासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. मालवण, कुडाळ, कणकवली भागात सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांचे हाल होतायत. अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचे प्रकारही घडलेत. सिंधुदुर्गात पडणा-या पावसामुळे नद्याच्या पातळीत वाढ झालीय. त्यामुळे नदीकिनारी भागात राहणा-या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मालवण तालुक्यातल्या कंदलगावमध्ये शाळेवर आंब्याचं झाड पडलं. सुदैवानं आज शनिवार असल्यानं शाळा लवकर सुटली त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
कोकणासह मुंबई आणि उपनगरांत पावसानं जरी दमदार सुरूवात केली असली तरी तरी राज्यातील अनेक जिल्हे अजूनही पावसाची वाट पाहताहेत.. मराठवाडा आणि विदर्भ अजूनही कोरडाच आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दुष्काळसदृश्य पिरस्थिती निर्माण झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.