पुणे : भारतीय स्टेट बँकेनं पुणेकरांना वेगळी संधी उपलब्ध करून दिलीय. स्टेट बँकेची संपूर्ण पेपर लेस अशी देशातील पहिली डिजीटल शाखा पुण्यातील बाणेर रस्त्यावर सुरु झालीय.
बँकेत जाऊन नवीन खातं उघडायचं असो कि, एखादा व्यवहार करायचा असो. तुम्हाला ना पेनची आवश्यकता आहे आणि फोटोची.
या शाखेत तुम्हाला कुठला फॉर्म किंवा स्लीप देखील भरावी लागणार नाही. या शाखेतील सर्व कारभार डिजीटल असणार आहे. ' एसबीआय इन टच लाईट ' या नावानं हि नवीन सेवा सुरु करण्यात आलीय.
पूर्ण डिजिटल शाखा सुरु करणारी एसबीआय ही देशातील पहिली बँक आहे. पुण्यात आयटीमध्ये काम करणारा मोठा वर्ग आहे. खास त्यांना डोळ्यासमोर ठेऊन ही डिजिटल शाखा सुरु करण्यात आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.