कल्याण : पित्रुपक्ष संपतो न संपतो तोच मध्यरात्री १२ वाजता भाजपने तिकीट वाटप सुरू केलं. मध्यरात्री तिकीट वाटपानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसरीकडे शिवसेनेने १२२ उमेदवारांची यादी तयार केलेय. त्यामुळे भाजप, शिवसेना पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्यात जमा आहे. याबाबत कोणतंही अधिकृत भाष्य न करता दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरु केलीय.. शिवसेनेकडून १२२ उमेदवारांची यादी तयार असून उमेदवारांना रात्री एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. तर भाजपकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय.
कल्याण डोंबिवली निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. मात्र युतीबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्यानं दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. दरम्यान युती तोडण्यासाठी पुन्हा घटस्थापनेचा मुहूर्त साधला जातो का याकडं आता साऱ्याचं लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.