पालघऱ : पालघर शहरातील अल्याळी येथे कर्जाला कंटाळून मुलगा आणि आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये आईचा घटनास्थळी मृत्यू झाला असून मुलावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलगा रोहन गोपाल रामचंद्रन याने रात्री झोपताना आपल्या बेडरूम मध्ये कार्बन डाय ऑक्साईड सोडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. घराबाहेर आपली स्कूटी गाडी चालू करून सायलेनसरला पाईप जोडून तो बेडरूममध्ये सोडून तो झोपी गेला.
कार्बन डाय ऑक्साईड बेडरूममध्ये जमा होवून रोहनच्या आईचा गुदमरून मृत्यू झाला. तर रोहन बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. शेजारच्याच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. दरम्यान एका हॉलीवूड चित्रपटात अश्या प्रकारे आत्महत्या पाहिल्याने तसा प्रयत्न केला असल्याचे रोहनने सांगितले आहे.
पालघर पोलिस या घटनेची अधिक चौकशी करीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.