सैनिकांच्या पत्नींविषयी भाजप पुरस्कृत आमदाराचं संतापजनक वक्तव्य

सैनिकांच्या पत्नींविषयी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांचं अत्यंत संतापजनक वक्तव्य.

Updated: Feb 19, 2017, 01:07 PM IST
सैनिकांच्या पत्नींविषयी भाजप पुरस्कृत आमदाराचं संतापजनक वक्तव्य  title=

सोलापूर : सैनिकांच्या पत्नींविषयी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केलंय. जिल्हा परिषदेच्या प्रचारसभेत बोलताना देशाच्या जवानांचा परिचारक यांनी अपमान केला आहे.

जवानांच्या पत्नींबाबत बोलताना त्यांची बौद्धिक दिवाळखोरी समोर आली आहे. त्यांच्या या वक्त्व्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. सोशल मीडियातूनही परिचाराकांचा निषेध केला जातो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी ते सोलापुरातल्या भोसे गावात आले होते. या प्रचारसभेत त्यांनी हे संतापजनक वक्तव्य केलं.