मुंबई : दहावीमध्ये वर्ष 2014-15 या वर्षात नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी निराश होण्याचं काहीही कारण नाही... कारण, नापास झाल्यामुळे तुमचं वर्ष मात्र वाया जाणार नाही. या परीक्षेत पास होण्याची आणखी एक संधी तुम्हाला पुढच्याच महिन्यात मिळणार आहे.
शालेय शिक्षणमंत्री विनोदमंत्री विनोद तावडे यांनीच ही घोषणा केलीय. यंदा एसएससी बोर्डाच्या परीक्षेत बसलेल्या पण यश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या महिन्यात परिक्षा हीच परीक्षा पुन्हा देता येणार आहे. तर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लगेचच या परीक्षेचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती तावडे यांनी दिलीय.
दरवर्षी, मार्चमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात येते. मात्र, यंदा जुलैमध्येच होणार परिक्षा होणार आहे त्यामुळे ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात येणार नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांना लगेचच पुढचा प्रवेश मिळवून 1 सप्टेंबरपासून आपल्या पुढच्या अभ्यासाला सुरुवात करता येईल. पण, यासाठी मुलांना लगेचच परीक्षेसाठी मानसिक आणि शैक्षणिक तयारी करावी लागणार आहे.
Pleased to announced supplementary exam for students who failed in SSC'15. The exam will help them to save a year and progress academically.
— Vinod Tawde (@TawdeVinod) June 11, 2015
Re-exam in 2nd week ofJuly for students who failed SSC'15. Results out by 3rd week of Aug & studies can be resumed by 1Sep. All the best!
— Vinod Tawde (@TawdeVinod) June 11, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.