सरकार विरोधात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईकर रस्त्यावर

राज्य शासन, सिडको, MIDC आणि महापालिकेविरोधात आज हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 10, 2017, 11:18 PM IST
सरकार विरोधात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईकर रस्त्यावर title=

नवी मुंबई : राज्य शासन, सिडको, MIDC आणि महापालिकेविरोधात आज हजारोंच्या संख्येने नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले. 

या मोर्च्यात दिघावासीय, व्यापारी, माथाडी कामगार, झोपडपट्टीधारक तसंच प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. 

महापालिकेतर्फे झोपडपट्टी, गावठाण, प्रकल्पग्रस्तांच्या 2000 पूर्वीच्या घरांवर करण्यात येणारी कारवाई, पालिकेतर्फे वाढीव मालमत्ता कर आकारणी, त्याचप्रमाणे व्यापा-यांच्या दुकानावर कारवाई, तसंच अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता. 

या मोर्च्याला भाजपकडून उत्तर देण्यात आले. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन तात्काळ प्रत्युत्तर दिले. हा मोर्चा काढून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी यावेळी केला.