नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मराठवाड्यातले सर्व, तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या पाच जिल्हे मतदानासाठी सज्ज झाले आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. 25 पैकी 15 जिल्हा परिषद आणि 165 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. एकूण 2 हजार 567 जागांसाठी 11 हजार 989 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
यासाठी 24 हजार 31 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहेत. निवडणूक प्रमुख्यानं मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नगर, विदर्भातील यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातमध्ये सकाळी साडे सात वाजता मतदानाला सुरूवात होईल. गडचिरोली वगळता सर्व ठिकाणी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील 51 सदस्यीय जिल्हा परिषद आणि 102 पंचायती समिती जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होतय. यातील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आठ तालुक्यातील 35 जिल्हा परिषद जागा आणि 70 पंचायत समिती जागांसाठी हे मतदान होणार आहे. सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. तब्बल साडेचार लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी 711 मतदान केंद्र आहेत. यातील संवेदनशील केंद्राची संख्या 226 असून अतिसंवेदनशील केंद्राची संख्या 167 आहे. मतदानासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आलीय.
संपूर्ण मराठवाड्यात आज जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे, त्यासाठी प्रशासनाचीही जय्यत केलीये.. 15 लाखांपोक्षा जास्त मतदार आपलं मत नोंदवणार आहेत...यासाठी 1 पोलिस अधिक्षक, 10 पोलीस उपअधिक्षक आणि 150 पोलीस निरिक्षक 1300 होमगार्ड यावेळी ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेत.. तसंच हे मतदान सुरळीत पार पाडावं यासाठी 1700 कर्मचारी काम करणार आहेत.
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील राघूनाथपूर या गावानं मतदानावर बहिष्कार टाकलाय. वैजापूरहून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाचा रस्ता खूपच वाईट आहे...अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नाही..रस्ता खराब असल्यानं गावातल्या शेतकऱ्यांना व्यापार करणं देखील अवघड झालंय. इतकंच नाही तर पाण्याचा टँकर देखील गावात येत नसल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी मुख्य रस्त्यापर्यंत जावं लागतं. विद्यार्थी शाळेत जाताना अनेक अडचणी असून अनेक वेळा मागणी करून देखील रस्ता होत नसल्यानं आयएसओ मान्यताप्राप्त असलेल्या ग्रामपंचायतीतले ग्रामस्थ त्रस्त झालेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गावकऱ्यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय.
जळगाव जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी तसेच पंचायत समितीच्या १३४ गणांसाठी आज मतदान होणार असून प्रशासनाने पूर्ण तयारी केलीय. एकूण २३८७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदानप्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी १६ हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आलेय. जळगाव जिल्ह्यात भाजप शिवसेना यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे ..आजी माजी मंत्री खासदार आमदार यांच्या परिवारातील लोकांना उमेदवारी दिल्याने घराणे शाहीला मतदार स्वीकारतात का ? याचा फैसला मतदार मतपेटीतून करणार आहेत.
बुलडाणा जिल्हयात जिल्हा परिषदेच्या 60 गटासाठी व पंचायत समित्यांच्या 120 गणाकरीता आज मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. या निवडणूकीसाठी 1 हजार 691 मतदान केंद्र सर्व सुविधांनी सज्ज ठेवण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 6 हजार 764 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडणूकीत 14 लक्ष 87 हजार 139 मतदार आपला मतदानाचा पवित्र हक्क बजाविणार आहे.