इथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.

Updated: Jul 11, 2014, 08:41 AM IST
इथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक  title=

पुणे : दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.

इथे पाहा दहावी/बारावी परीक्षेचं वेळापत्रक

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केल्यानंतर, बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २६ मार्च तर दहावीची परीक्षा ३ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. व्यवसाय अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) घेऊन बारावीला बसलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान होईल.

विद्यार्थ्यांच्या मनावरील बोर्डाच्या परीक्षेचा ताण-तणाव कमी व्हावा तसंच शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचं नियोजन करता यावं, या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळातर्फे गेल्या काही वर्षापासून दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केलं जातं. त्यानुसार मंडळाने जुलै महिन्यातच हे वेळापत्रक प्रसिद्ध केलंय.

राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात.

मंडळाच्या https://mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर वेळापत्रक पाहायला मिळेल. वेबसाइटवरील वेळापत्रक हे तात्पुरत्या स्वरूपाचे असून लेखी परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून मिळणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, असं राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी स्पष्ट केलंय. तसंच प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षांचं वेळापत्रक परीक्षेपूर्वी कळविण्यात येईल, असंही पाटील यांनी सांगितलंय..
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.